संतापजनक..तरुणींची छेड काढण्यास रोखले म्हणून पोलिसाच्या डोक्यात दगड घातला

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद येथे समोर आली असून तीन तरुणींची छेडछाड करून त्यांच्या दुचाकीची चावी हिसकावून घेऊन त्यांची छेड काढण्यात आल्याचा प्रकार उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर चार मवाली असलेल्या तरुणांनी चक्क पोलिसाला मारहाण करत त्यांच्या डोक्यावर दगड घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही घटना समोर आलेली असून सचिन सुधाकर म्हस्के ( राहणार पेठे नगर औरंगाबाद ) असे जखमी पोलिसाचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन मैत्रिणी दुचाकीवरून आलेल्या होत्या. तेथील एका टेकडीवर त्या बसलेल्या असताना विद्यार्थी वसतिगृहाजवळ तीन ते चार अज्ञात तरुणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली आणि त्यांना मारहाण देखील केली . ड्युटीवर जात असलेले सचिन म्हस्के यांना पाहिल्यानंतर या तरुणींना धीर आला आणि त्यांनी सचिन म्हस्के यांना मदत करण्याची विनंती केली.

चार मवाली आमची छेड काढत आहेत आणि आमची दुचाकी त्यांनी हिसकावून घेतलेली आहे असे सांगितल्यानंतर सचिन म्हस्के यांनी 112 नंबरवर त्यांना कॉल करण्यास सांगितले त्यावेळी आरोपी तिथे आले आणि ‘ या मुलींना वाचवण्याचा तू प्रयत्न का करतोस ? त्या तुझ्या कोण लागतात ? ‘ असा प्रश्न करत म्हस्के यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हे आरोपी एकाच गाडीवर फरार झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व जण कैद झालेले असून बेगमपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि या मवाली तरुणांचा शोध सुरू आहे.


शेअर करा