पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दुसरा प्रेमविवाह केला अन अचानक एके दिवशी..

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून एका महिलेचा शॉक लागून मृत्यू झालेला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी हा शॉक तिला तिच्या पतीनेच दिल्याचे समोर आले आहे. तरुणीने दुसऱ्यांदा प्रेमविवाह केला आणि यावेळी तरी आपल्या नशिबात प्रेम असेल अशी तिची अपेक्षा होती मात्र तिच्या आयुष्याला धोका झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नीतू असे या तरुणीचे नाव असून दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले होते मात्र तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने पतीकडून घटस्फोट घेतलेला होता. तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने तिच्या भावाला मेसेज करून या मेसेजमध्ये आपल्याला पती नणंद आणि तिच्या मुली यांच्याकडून छळ होत आहे असे देखील तिने म्हटले होते.

नीतू हिचा भाऊ संदीप कुमार याने सांगितले की, ‘ तिचा पहिला नवरा तिला सतत दारू पिऊन मारहाण करत होता त्यामुळे तिने त्याच्या कडून घटस्फोट घेतला आणि मंडोली गावातील अनिल कुमार नावाच्या तरुणासोबत लग्न केलेले होते. घटना घडण्याच्या आधी पाच दिवसांपूर्वी तिने मला मेसेज करून मला सासरी छळले जात आहे असे म्हटले होते त्यानंतर मी तिच्या पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने आपल्याशी बोलणे टाळले आणि नीतू हिला नजर कैदेत ठेवले.

पोलिसांनी केलेल्या तपासात नीतूला विजेचा धक्का लागल्याचे समोर आलेले असून तिच्या कानाला आणि नाकाला जखमा झालेल्या आहेत. अनिल याच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते कारण नीतू हिचा हा दुसरा विवाह होता. नीतू ही दिसायला सुंदर असल्याने अनिल तिच्या प्रेमात पडलेला होता. दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर तरी आपल्या नशिबात प्रेम राहील अशी तिची अपेक्षा होती मात्र सर्व काही स्वप्नातच होतं आणि अखेर सासरच्या मंडळींच्या जाचात तिचा बळी गेला.


शेअर करा