धार्मिक कार्यक्रमात नाचणाऱ्या पोलिसांना देण्यात आल्या सूचना

शेअर करा

गणेश विसर्जनाच्या दरम्यान तसेच इतर काही ठिकाणी खाकी वर्दी घालुन कार्यरत असलेले पोलीस गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना आढळून आले होते. सोशल मीडियामध्ये पोलिसांचे असे वर्तन योग्य की अयोग्य याविषयी मोठी चर्चा झाली. अनेक जणांनी खाकी वर्दी अंगात असताना अशा स्वरूपाचा डान्स करणे शोभत नाही त्यातून इतर धर्मीयांमध्ये देखील चुकीचा संदेश जातो अशीही टीका केली होती त्यानंतर पोलीस महासंचालक यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेतली गेली आणि ‘ गणवेशात पोलीस नाचताना दिसले तर त्याची काही खैर नाही वर्दीत कुणीही नाचू नये ‘ अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत .

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त राज्यात लावण्यात आलेला होता. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना कुठेही घडली नाही मात्र पोलिसांच्या मिरवणुकीतील डान्सची चर्चा राज्यभर झाली. ड्युटी केल्यानंतर मिरवणुकीत पोलीस नाचले तर त्याने काय बिघडते असे देखील काहींचे म्हणणे होते मात्र काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे खाकी वर्दी अंगात असताना आपण राज्यघटनेचे रक्षक आहोत त्यामुळे आपले कुठलेही कृत्य इतर धर्मीयांमध्ये चुकीचा संदेश देणार नाही असे आपले वर्तन असायला हवे , असाही एक सूर होता.

केवळ मुंबईच नव्हे तर पुणे अन कोल्हापूरमध्ये देखील तसेच ग्रामीण पातळीवर देखील काही ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी डान्स केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. पोलिसांनी ढोल वाजवला तसेच वैयक्तिक पातळीवर देखील भाषणे केली त्याचेही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते त्यानंतर वरिष्ठ पोलिस दलाकडून यासंदर्भात गंभीर दखल घेण्यात आलेली असून कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात न नाचण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत .


शेअर करा