उच्चशिक्षित डॉक्टर दाम्पत्याने क्रूरतेची मर्यादा ओलांडली , नोकरीसाठी दोघींना आणले अन ..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली असून अंधश्रद्धेच्या आहारी जात उच्चशिक्षित असलेल्या एका डॉक्टर दाम्पत्याने चक्क दोन महिलांची मंगळवारी गळा चिरून हत्या केलेली आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून दफन देखील केले होते. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात हा प्रकार उघडकीला आलेला असून परिसरात या डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर असलेल्या या व्यक्तीचे भगवाल सिंग असे असून त्याने परिसरात राहणाऱ्या रोसेलीन आणि पद्मा या दोन महिलांची अमानुषपणे हत्या केली. डॉक्टर भगवाल हे आर्थिक संकटात अडकलेले असल्याने त्याची पत्नी लीला हिने पेरुंबवूर येथील एका रशीद शफी नावाच्या मांत्रिक व्यक्तीशी संपर्क साधला होता त्यावेळी त्याने मानवाचा बळी दिल्याने देव प्रसन्न होईल असे सांगत दोन महिलांचा बळी देण्यास सांगितले होते.

रशीद शफी असे या नराधम मांत्रिकाचे नाव असून डॉक्टरच्या पत्नीने त्याच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्याने बलिदानासाठी दोन महिलांची व्यवस्था करा त्यानंतर देव प्रसन्न होईल आणि तुम्हाला आर्थिक सुबत्ता येईल असे सांगितले होते त्यानंतर डॉक्टर यांना महिला मिळवण्यात अपयश आले म्हणून त्यांनी मांत्रिक यालाच महिला उपलब्ध करून देण्याची विनंती केली . डॉक्टरकडे नोकरीचे आमिष दाखवत दोन महिलांना मांत्रिक त्यांच्याकडे घेऊन गेला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दोन्ही मृतदेह पुरून टाकण्यात आले होते मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॉक्टर दांपत्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

भगवाल सिंग याच्या घरी गेल्यानंतर आरोपींनी या महिलांना बांधत त्यांचे हाल हाल केले. त्यांचे स्तन कापून रक्त वाहू दिले आणि त्यानंतर त्यांचा गळा चिरून हत्या केली. त्यातील पद्मा हीच या शरीराचे तब्बल 56 तुकडे करण्यात आले होते. रशीद शफी हा मुख्य आरोपी असून तो अत्यंत विकृत आणि इतरांच्या वेदनात आनंद मानणारा व्यक्ती असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. याआधी देखील त्याला 75 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती मात्र तो जामिनावर सुटलेला होता. आरोपी रशीद याने या महिलांना असलेल्या चित्रपटात तुम्ही काम करा. तुम्हाला भरपूर पैसे देऊ असे सांगत डॉक्टरकडे घेऊन आला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. पोलीस तपासात आरोपींनी मयत महिलांचे मांस खाल्ल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.


शेअर करा