दिसत नाही का ? राधाकृष्ण विखे पाटलांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

शेअर करा

‘ त्यांचं झाल्यानंतर आता तुमचं सुरू करू नका ‘ अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नगर जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपसा प्रकरणात वाळू उपसा करणाऱ्यांची कानटोचणी केली होती मात्र त्यानंतर देखील अवैध वाळू उपसा सुरू असल्याने चक्क महसूल मंत्री विखे पाटलांनी नेवासा तालुक्यात पाहणी करताना वाळू उपसा करून देणाऱ्या दोन बोटी पकडून दिलेल्या आहेत . स्थानिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यासमोरच विखे पाटलांनी चांगल्या पद्धतीने झापले आणि या बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले.

नेवासा तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी विखे-पाटील गेलेले असताना प्रवरासंगम पासून थोड्या अंतरावर असलेल्या मंगळापुर येथील एका वस्तीवर दोन बोटी उभ्या असलेल्या दिसताच विखे पाटलांनी तात्काळ त्या बोटिकडे धाव घेतली . जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकारी देखील तेथे पोहोचले आणि स्थानिक रहिवाशांची देखील चांगलीच गडबड उडाली.

मंत्र्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू करताच अधिकाऱ्यांना काय बोलावे हेच सुचेना झाले आणि परिसरातील रहिवासी देखील चांगलेच गोंधळून गेले. स्थानिक अधिकारी देखील विखे-पाटलांच्या प्रश्नावर निरुत्तर झालेले होते. ज्यांची वस्ती आहेत त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करा अशा देखील सूचना त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिल्या. एका रहिवाशाने पुढे येत सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तुमच्या जर बोटी नाहीत तर तुम्ही इथे ठेवू कशा दिल्या ? अशा शब्दात विखे पाटील यांनी त्या रहिवाशाची देखील कानउघाडणी केली आणि पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून त्याला पोलिस स्टेशनला बोलावून घेतले. विखे-पाटलांच्या धडाडीमुळे स्थानिक अधिकार्‍यांचे देखील धाबे दणाणले असून वाळू प्रकरणी विखे पाटील गेल्या काही महिन्यात आक्रमक झालेले दिसून येत आहे.


शेअर करा