‘ नाठाळ ‘ तरुणावर हनी ट्रॅप चालला नाही , नगरच्या तरुणीला बेड्या

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीला आलेली असून नगर जिल्ह्यातील एका तरुणीने एका तरुणाला लॉजवर घेऊन जात त्याचा अर्ध नग्न अवस्थेतील फोटो काढला आणि आपल्यावर अत्याचार केल्याची खोटी तक्रार देण्याची धमकी देत त्याच्याकडून 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. सदर तरुण अजिबातही घाबरून गेला नाही मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलीस तेथे पोहोचले.

उपलब्ध माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी नितीन शिंदे वय 28 आणि संबंधित तरुणी हिला बेड्या ठोकलेल्या असून न्यायालयाने त्यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लॉजवर घेऊन जात या तरुणाकडून मोठी खंडणी वसूल करण्याचा तरुणीचा प्रयत्न होता मात्र तरुण अजिबातच डगमगला नाही त्यामुळे या दोघांना हातात बेड्या पडल्या.

बार्शीजवळील एका गावात 5 ऑक्टोबर रोजी भगवती देवीची यात्रा झालेली होती त्यासाठी नगर जिल्ह्यातील काही तरुणी नृत्य करण्यासाठी आलेल्या होत्या त्यावेळी संबंधित तरुणीने तरुणाचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याला गुरुवारी सकाळी 27 तारखेला दहा वाजता फोन केला. मी बार्शीमध्ये आलेले आहे तू शिवाजी कॉलेज जवळ ये असे तिने सांगितल्यानंतर हा तरुण तिथे पोहोचला आणि त्यानंतर या तरुणीने मी कुर्डुवाडी रोडवर उभी आहे असे सांगत चहा घेण्याच्या बहाण्याने त्याला ती लॉजवर घेऊन गेली.

लॉजवर घेऊन गेल्यानंतर तरुणीने त्याचा आधी अर्धनग्न फोटो काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 25 हजार रुपयांची खंडणी मागितली . सदर फोटो हा अर्धनग्न असल्याने हा फोटो व्हायरल झाल्याने काही फरक पडणार नाही याची तरुणाला जाणीव होती म्हणून तो घाबरून गेला नाही हे पाहून तिने त्याला चक्क 25 हजार रुपयांची खंडणी दे नाहीतर तू माझ्यावर अत्याचार केला असे मी ओरडून सांगेल असे देखील ती म्हणाली त्यानंतर मात्र तरुण घाबरून गेला हे पाहून तिने त्याच्याकडील पाचशे रुपये स्वतःच्या खात्यावर काढून घेतले

दरम्यानच्या काळात अचानकपणे पोलीस देखील तिथे आले आणि त्यांनी तरुणीला ‘ तू पळवून आणलेले आहे ‘ असे सांगत तिच्यासह त्याला ताब्यात घेतले . पोलीस स्टेशनमध्ये नेले असता तरुणाने झाला प्रकार पोलिसांपुढे कथन केला त्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिचा साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा