खाकीला काळिमा..मित्राच्या पत्नीवर बलात्कार करून प्रेयसीसोबत फरार

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून मित्राच्या पत्नीवर बलात्कार करून वसई पोलीस दलातील एक हवालदार फरार झालेला आहे. 18 नोव्हेंबर रोजी नालासोपारा पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला असून आरोपी हा त्याच्या प्रेयसीसोबत फरार झालेला आहे पीडित महिलेने पोलिसात धाव घेत आरोपीने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार दाखल केली होती.

उपलब्ध माहितीनुसार राहुल लोंढे असे फरार झालेल्या आरोपी हवालदाराचे नाव असून तो आणि त्याची प्रेयसी प्रिया उपाध्याय हीदेखील त्याच्यासोबत फरार आहे. पीडित महिला आणि तिच्या पतीची लोंढे याच्यासोबत ओळख आहे. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे असल्याने 23 आणि 24 सप्टेंबर रोजी आरोपीने महिलेला फोन करून त्याच्या घरी बोलावले होते. पीडित महिला ही एका खाजगी कंपनीत काम करत असून तिचा पती दारूच्या आहारी गेलेला असल्याने लोंढे त्याची समजूत काढण्यासाठी महिलेच्या घरी येत असायचा.

पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे महिला वैतागली होती त्यामुळे त्याची दारू सोडवण्यासाठी तुम्ही घरी या असे महिलेने लोंढे आणि त्याची प्रेयसी असलेली उपाध्याय तिला सांगितले होते त्यानंतर लोंढे याने आम्ही आता येऊ शकत नाही तुम्ही आमच्या घरी या असे सांगितले त्यावेळी पीडित महिला तिथे पोचल्यानंतर या दोघांनी तिला दारू ऑफर केली आणि त्यात गुंगीचे औषध मिसळले असल्याने पीडितेला चक्कर येऊन तिला पुढे काय घडले हे समजलेच नाही.

थोडीशी शुद्ध आली त्यावेळी महिलेने आरोपी राहुल लोंढे आणि त्याची प्रेयसी प्रिया उपाध्याय यांनी आपले कपडे काढले त्यानंतर लोंढे याने आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले आणि उपाध्याय हिने देखील आपल्या सोबत नको तो प्रकार केला असे महिलेचे म्हणणे आहे. सदर प्रकार घडल्यानंतर चोवीस तासांनी आरोपींनी मला माझ्या घरी आणून सोडलं त्यानंतर मी पतीला याप्रकरणी कल्पना दिली आणि आम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवली असे सांगितले असून लोंढे आणि उपाध्याय सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


शेअर करा