‘ भारत जोडो ‘ मध्ये महाराष्ट्रातील दिग्गज होणार सहभागी, गोदी मीडियात मौन

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे या यात्रेचे आगमन होणार आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असल्याने ग्रामीण भागातील काँग्रेस पुढारी तसेच शहरातील काँग्रेस मोठ्या प्रमाणात यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या देखील सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रा साध्या तेलंगाना येथे असून महाराष्ट्रातील कार्यक्रमाची माहिती देताना अशोक चव्हाण यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार हे 8 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे मुक्काम करतील आणि 9 नोव्हेंबर रोजी नायगाव येथून यात्रेत सहभागी होतील. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या देखील सहभागी होतील अशी माहिती दिलेली आहे.

तब्बल ३५०० किलोमीटर चालणारी ही यात्रा असून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा सध्या सुरू आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेने काँग्रेसमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झालेली असून देशातील बेरोजगारी, महागाई आणि द्वेषाचे वातावरण याच्या विरोधात ही यात्रा काढण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर, शंकरनगर, कृष्णूर, जवाहरनगर, नांदेड, अर्धापूर असे सहा दिवस ही यात्रा नांदेड जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून देखील ही यात्रा जाणार असून गोदी मीडियाने मात्र या यात्रेविषयी मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा