विखे पाटलांकडून मोदींचे गुणगान तर ‘ भारत जोडो ‘ वर तिखट प्रहार

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत, ‘ मी यापूर्वीच त्यांना काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्या. विविध योजनेमधून सामान्य नागरिक पक्षाशी जोडला जातो मात्र तो यात्रेतून जोडला जात नाही ‘ असे म्हटले आहे. पूर्ण देशात काँग्रेसची वाताहत झालेली असून ही भारत जोडो यात्रा नाहीतर पुढारी जोडो यात्रा आहे असे म्हटले आहे.

पुणे येथे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘ काँग्रेस पक्षाची देशभरात वाताहत झालेली आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा पुढारी जोडो यात्रा झाली आहे यापेक्षा वेगळे महत्त्व त्याला राहिलेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसची अवस्था कशी झाली हे आपण पाहिले आहे. राज्याची आणि देशाच्या पातळीवर काँग्रेसची सारखीच अवस्था आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना आता त्यांना कोणी गृहीत धरत नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने फारसा फरक पडेल ‘, असे वाटत नाही.

गुजरातमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळेल काय याबद्दल प्रश्न विचारला असता विखे पाटील म्हणाले की, देशात विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातकडे पाहिले जाते नरेंद्र मोदी यांना जनाधार असल्याने यंदाच्या निवडणुकीत सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजरातमधील जनता मोदी यांच्या पाठीशी राहील यात तिळमात्र शंका नाही, असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा