नवरा घरातील सीसीटीव्ही पाहत असताना बायको ‘ लटकलेली ‘ , सुसाईड नोटमध्ये म्हटलंय..

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना मध्य प्रदेशात समोर आलेली असून एका महिला इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केलेली आहे. आपल्या घरातील सीसीटीव्ही तिचा पती मोबाईलवर पहात होता त्यावेळी धक्कादायक म्हणजे त्याला त्याची पत्नी लटकलेल्या अवस्थेत दिसली . करुणा शर्मा असे या महिलेचे नाव असून तिच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट आढळून आलेली आहे. तिचे पती उत्तम शर्मा हे भिलाई येथे राहत असून ऑनलाईन आपल्या घरातील सीसीटीव्ही पाहत होते त्यावेळी त्यांना हा धक्कादायक प्रकार अचानकपणे दिसला.

पती उत्तम शर्मा यांनी तात्काळ आपल्या शेजार्‍यांना फोन केला आणि त्यानंतर शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत करून शर्मा यांचा मृत्यू झालेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून करुणा शर्मा या मानसिक तणावाखाली होत्या त्यामुळे त्यांनी आपल्या आठ वर्षाच्या मुलीला त्यांच्या पतीकडे भिलाई इथे पाठवलेले होते. सातत्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्यांनी आपल्याला धमक्या देणारे व्यक्ती हेमंत त्रिवागो, त्याची पत्नी प्रमिला, मोना शर्मा आणि आदित्य अग्रवाल यांची नावे लिहिलेले आहेत.

सुसाईड नोटमध्ये करुणा यांनी रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण चांगला आहे . असे मित्र असतील तर शत्रूंची गरज काय ? / माझं जे काही वाईट करायचं असेल ते तेच करतील असं म्हटलेलं आहे . रोज माझ्या डोक्यात मरणाचे विचार यायचे मात्र हिम्मत करून पुन्हा नव्याने उभारी घ्यायची मात्र नवीन काहीच होत नव्हतं. 31 जुलैच्या रात्री बारा वाजता आदित्य याने आपल्या घरात येऊन तोडफोड केली आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे न देण्याची धमकी तो देत असून मोनामुळे प्रमिला हिनेदेखील पैसे देणे कमी केले . जुलै 2019 पासून पैसे देणे पूर्णपणे थांबवले त्यामुळे आपल्यावर देखील कर्ज झालेले आहे असे देखील सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.


शेअर करा