शिर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणात चार जण ताब्यात , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

नगर जिल्ह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार शिर्डी इथे उघडकीला आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ कारवाई करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत तर एक विधी संघर्ष बालक देखिल ताब्यात घेण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उमेश राठोड ( वय 21 ) , जितेंद्र चव्हाण ( वय 21), लखन गोसावी ( वय 23 सर्वजण राहणार कुंभारी खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव ) तसेच एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांचा डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे.

नगर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 18 जुलै रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर ही महिला शिर्डी येथे 14 नोव्हेंबर रोजी आढळून आली त्यावेळी तिने शिर्डी इथे चार जणांनी आपल्यावर जबरदस्तीने लॉजवर नेऊन अत्याचार केला असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या विरोधात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि पथकाला तपासाच्या सूचना दिल्याआणि त्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली तर एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.


शेअर करा