भारत जोडो यात्रेवर चक्क गुप्तचर यंत्रणेकडून पाळत ?

शेअर करा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असून भाजपचे त्यामुळे धाबे दणाणले पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू होत असल्याच्या अनेक घटना आधीही समोर आल्या असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारकडून आता चक्क गुप्तचर अधिकारी यांचा वापर करून केंद्र सरकार ही यात्रा रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप सोमवारी केलेला आहे. हरियाणातील सोहना पोलिसांकडे काँग्रेसने या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.

काँग्रेसने म्हटल्याप्रमाणे, ‘ सुरुवातीला भारत जोडो यात्रा बदनाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय बालहक्क आयोग यासारख्या घटनात्मक संस्थांचा वापर करून ही यात्रा थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले त्यासाठी सरकारने घटनात्मक आणि कायदेशीर संस्थांचा वापर केलेला आहे त्यावर आम्ही उत्तर देखील दिले आहे .’

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुढे म्हटले की, ‘ जेव्हा पंतप्रधानांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एका लहान मुलीला प्रचारात उभे केले होते त्यावेळी निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क आयोग यांच्या ही बाब निदर्शनास आम्ही आणली होती मात्र त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही तर भारत जोडो यात्रेत स्वतःहून सहभागी झालेल्या मुलांवरून काँग्रेसला निशाण्यावर घेण्यात येत आहे याबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.


शेअर करा