नगरच्या नामांतरासाठी मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना मनसेच्या वतीने देण्यात आलेले आहे. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, इंजिनियर विनोद काकडे, उपाध्यक्ष तुषार हिरवे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन मनपा आयुक्त पंकज जावळे यांना दिलेले आहे.

मनसेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ‘ मराठी मायभूमीत अनेक रत्ने जन्माला आली आणि महाराष्ट्र भूमी पावन झाली. राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात अमर झालेले आहे. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी नगर जिल्ह्यात चौंडी येथे झालेला असून जनतेच्या मनात त्यांचे नाव कायम राहावे यासाठी नगर जिल्ह्याला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. राज्य सरकारने हा प्रस्ताव महापालिकेकडून पारित करून घेण्यासाठी पत्र पाठवले होते त्यामुळे तात्काळ हा प्रस्ताव पारित करावा त्याला मनसेचा पाठिंबा राहील , ‘ असे म्हटले आहे.


शेअर करा