नगरपासून ठाणे जिल्हा येणार अवघ्या सहा किलोमीटरवर

शेअर करा

नगर शहरापासून प्रत्यक्षात बरेच अंतर असलेल्या भंडारदरा धरण येथून ठाणे जिल्हा दृष्टीपथास यायचा मात्र परिसरातील डोंगर रांगा आणि दुर्गम भागात असल्या कारणाने नागरिकांना ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी सुमारे 60 किलोमीटरचा वळसा घालून मग ठाणे शहरात प्रवेश करता यायचा मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून अवघ्या सहा किलोमीटरवर नगर जिल्ह्यापासून ठाणे जिल्हा येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांना देखील या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. ठाणे जिल्ह्यात प्रवेश करायचा झाला तर माळशेज घाट हे अंतर मोठ्या प्रमाणात असून शहापूर, शेंदवा, डोळखांब, भंडारदरा, राजुर, अकोले, संगमनेर हा प्रस्तावित मार्ग असून आता अवघ्या सहा किलोमीटरमध्ये नागरिक ठाणे जिल्ह्यात पोहोचू शकतील. 2013 मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते मात्र आता पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला बाधा न आणता रस्ता पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे.

मुंबई-ठाणे परिसरातील अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे येत असतात. मुंबई ठाण्यावरून अनेक दिंडी देखील साईबाबांच्या दर्शनासाठी येतात त्यांना देखील यासाठी सुमारे आठ ते नऊ दिवस लागतात मात्र हा मार्ग झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसात ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी इथे येऊ शकतील तसेच हा रस्ता झाल्यानंतर पर्यटनाच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात प्रगती होईल आणि त्यातून आदिवासी बांधवांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होऊ शकेल असा अंदाज आहे.


शेअर करा