गूढ उलगडलं..अखेर ‘ त्या ‘ प्रकरणाचे धागेदोरे मुलाच्याच घरात

शेअर करा

शात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोर इथे समोर आलेली असून एका आईने प्रियकराच्या मदतीने चक्क स्वतःच्या मुलाची अत्यंत अमानुषपणे हत्या केली आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केलेली असून या मुलाने त्याच्या आईला तिच्या प्रियकरासोबत नग्न अवस्थेत पाहिलेले होते त्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगेल अशी आईला धमकी दिली आणि आईने त्याची हत्या केली. वरूण असे या मुलाचे नाव असून खेळता खेळता तो बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर त्याच्या मामाने 16 जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दिलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , आई मुन्नी आणि तिचा प्रियकर टिंकू यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते. वरूण याचे वडील घरी नसताना अनेकदा मुन्नी ही तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असायची. असेच एकदा त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू असताना मुन्नी हीचा मुलगा वरूण तिथे आला आणि त्याने त्याच्या आईला प्रियकरासोबत नग्न अवस्थेत पाहिले त्यानंतर तो घाबरून गेला आणि त्याने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगेल असे त्यांना सांगितले त्यामुळे मुन्नी आणि तिचा प्रियकर घाबरून गेले.

दहा वर्षांचा असलेला वरूण खेळता खेळता 16 जानेवारी रोजी गायब झालेला होता त्यानंतर 17 जानेवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याचा मृतदेह गावाजवळच्या एका जंगलात आढळून आला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी तपासाचे धागेदोरे वरूण याच्या घरातच असल्याचे लक्षात आले आणि त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुन्नी हिने केलेल्या खुलासानंतर पोलीस देखील हैराण झाले. वरूण याचा खून केल्यानंतर त्याला तब्बल तीन तास आम्ही घरातच ठेवले आणि रात्र झाल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला असे त्याच्या आईने सांगितलेले असून तिला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरात केली जात आहे. महिलेचा प्रियकर हा नात्याने वरूण याचा काका लागत असून परिसरात गाजलेल्या या हत्याकांडाची धागेद्वारे अखेर मयत मुलाच्या घरातच सापडलेली आहेत.


शेअर करा