भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशात समोर आली असून भाजपच्या एका नेत्याने त्याची पत्नी आणि दोन मुलांना विष प्राशन करायला लावले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. त्यांच्या मुलाला झालेल्या दुर्धर आजारामुळे आणि उपचारामुळे होणाऱ्या खर्चामुळे ते बेजार झालेले होते अशी ही माहिती समोर आलेली आहे.

मध्य प्रदेशातील विदिशा येथील भाजपचे दुर्गानगर विभागाचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक असलेले संजीव मिश्रा यांनी त्यांची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह विष प्राशन केले त्यानंतर या चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात संजू मिश्रा यांच्या पूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याच्या आधी त्यांनी फेसबुकवर त्यांच्या अकाउंटवर ‘ माझ्या दोन्ही मुलांना दुर्धर आजार झालेला आहे अशी वेळ कुणावरही येऊ नये ‘ असे म्हटलेले होते.

संजीव मिश्रा यांचे एक ओळखीचे व्यक्ती गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेले मात्र ते बराच काळ दरवाजा उघडत नव्हते म्हणून या व्यक्तीने बेल वाजवली मात्र तरीही दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांना बोलवण्यात आले पोलिसांनी अखेर दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी मिश्रा कुटुंबीय बेशुद्ध अवस्थेत होते. संजीव मिश्रा, पत्नी नीलम, अनमोल आणि दुसरा मुलगा सार्थक या चारही जणांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेला आहे.


शेअर करा