वधूवर परिचय मेळाव्यात ‘ लग्नाळू ‘ पोहचले पण घडलं भलतंच..

शेअर करा

महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी झालेले असून अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही त्यामुळे वधूवर सूचक मंडळाचा सध्या सुळसुळाट झालेला असून या क्षेत्रात एजंट लोकांनी देखील धुमाकूळ घातलेला आहे. असाच एक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे समोर आलेला असून मुली दाखवतो म्हणून रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले मात्र त्यानंतर मुली दाखवल्या नाहीत म्हणून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंजली धावणे, कैलास नायकंदे ( राहणार पाठसांगवी जिल्हा उस्मानाबाद ) आणि रामा खैरे ( तालुका परंडा ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून त्यांनी सुशिक्षित मराठा वधू वर परिचय मेळावा या नावाने लग्नाळू तरुणाचे रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी रक्कम आकारलेली होती. अनेक जणांकडून ही रक्कम आकारल्यानंतर परिचय मेळाव्यात मुली येतील असे त्यांनी सांगितले मात्र प्रत्यक्षात कोणीही न आल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली .

तक्रारदार यांच्या महिन्याप्रमाणे, ‘ संबंधित संस्थेकडे वधू वर सूचक मंडळाचे मंडळ चालवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नसून त्यांनी कंपनी साडेतीनशे तरुणांचे बायोडाटा आपल्याकडे जमा केलेले होते त्यानंतर परिचय मेळाव्यात अनेक तरुणी तुम्हाला भेटतील असे आमिष दाखवून विवाहाच्या देखील तारखा त्यांनी दिलेल्या होत्या आणि 28 जानेवारी रोजी बार्शी येथे एका मंगल कार्यालयात हा मेळावा भरवण्यात आलेला होता मात्र तिथे एकही वधू पोहोचली नाही म्हणून तक्रारदार व्यक्तींना संशय आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.


शेअर करा