बारावीच्या पेपरला गेलेली अल्पवयीन मुलगी राहुरीतून गायब

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरी येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आलेली असून इयत्ता बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आलेले आहे .. सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही राहुरी तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबीयांसोबत राहत असून 18 तारखेला दुपारी बारावीचा पेपर राहुरी येथे असल्याकारणाने तिचे वडील तिला कॉलेजच्या गेटजवळ सोडून गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास पेपर सुटला त्यावेळी तिला घेण्यासाठी वडील पोहोचले मात्र ती बराच वेळ वाट पाहूनही आली नाही.

हतबल झालेल्या वडिलांनी त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांकडे चौकशी केली त्यावेळी ती पेपरला देखील आलेली नाही असे त्यांना शिक्षकांनी सांगितले त्यांनी. वडिलांनी तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीकडे चौकशी केली त्यावेळी त्यांच्याकडे देखील कुठलीच माहिती हाती लागली नाही म्हणून अखेर पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा