स्वतःही लग्न करेना अन माझं पण होऊ देईना , प्रेयसीच्या विरोधात प्रियकर पोलिसात

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात येथे समोर आलेली असून एका प्रेयसीला कंटाळून तरुणाने चक्क पोलीस ठाण्यात गाठत तिच्याविरोधात आपले गाऱ्हाणे मांडलेले आहे. तरुणाच्या म्हणण्यानुसार मला माझ्या प्रेयसीपासून वाचवा कारण ती माझ्यासोबत लग्नही करत नाही आणि मी दुसरीकडे लग्न करण्याचा प्रयत्न केला तर ते देखील होऊ देत नाही. सदर तरुणीने याआधी देखील माझे एक लग्न मोडलेले आहे असे त्याचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बेवहरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या विभागात हा तरुण राहत असून त्याचे वय 22 वर्षे असल्याचे समजते. मागील चार वर्षांपासून तो एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असून सदर मुलगी देखील याच पोलीस स्टेशन अंतर्गत असले हद्दीत राहते. दोघेही सध्या भाड्याच्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून मुलगी त्याच्यासोबत बायकोसारखी राहते मात्र ती तिच्यादेखील घरी ये जा करत असते.

तरुणाने पुढे म्हटले की मला तिच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सतत लग्नाचा विषय काढला की टाळाटाळ करते. चार वर्षे झाली तरी देखील ती लग्न करण्यास तयार नाही म्हणून अखेर माझ्या कुटुंबीयांनी माझा मित्र विवाह बाहेर लावण्याचा प्रयत्न केलेला होता . माझे लग्न देखील जमवलेले होते मात्र तरीदेखील ती शेवटच्या क्षणी दाखल झाली आणि तिने माझा विवाह होऊ दिलेला नाही.

स्वतःही ती माझ्यासोबत लग्न करत नाही आणि दुसरीकडे देखील मला लग्न करू देत नाही त्यामुळे मोठ्या अडचणीत मी सापडलेलो असून पहिले लग्न मोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देखील बसलेला आहे . ती मला अविवाहित ठेवू का इच्छित आहे हेच मला कळेना ? असे देखील या तरुणाचे म्हणणे असून पोलिसांनी तरुणीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे .


शेअर करा