आधीच दुःख कमी त्यात आई गेली , आईच्या मृतदेहावर सोडले प्राण

शेअर करा

आई इतकं जवळचं कुणीही नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. आई जगातून निघून गेल्यानंतर दुःखाचा जो काही डोंगर कोसळतो याची तुलना इतर कुठल्याच दुःखासोबत होऊ शकत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एक प्रकरण समोर आलेले असून हदगाव तालुक्यातील तामसा येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्यानंतर भेटण्यासाठी म्हणून आलेल्या मुलीने आई माझे कसे होणार असा हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच प्राण सोडल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गयाबाई किशनराव शेवाळकर असे आईचे नाव असून त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झालेला होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची एक मुलगी जयमाला दिलीपराव जाधव ( वय 56 ) या आईला भेटण्यासाठी आलेल्या होत्या. अंत्यदर्शनासाठी आल्यानंतर आई तुझ्याशिवाय माझे कसे होणार असे म्हणत त्यांनी आईच्या मृतदेहावर डोके टेकून रडायला सुरुवात केली आणि याच दरम्यान त्यांना त्रास होऊ लागला त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

मयत जयमाला यांच्या पतीचे आठ महिन्यांपूर्वी निधन झालेले असून एक वर्षांपूर्वी यांचे सासू-सासरे यांचे देखील निधन झालेले आहे. सासू-सासरे आणि पती हे जगातून निघून गेल्यानंतर जयमाला या मोठ्या दुःखात होत्या याच दरम्यान आईचा देखील मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांनी आईला भेटण्यासाठी धाव घेतली मात्र प्रचंड दुखात आईच्या मृतदेहावरच त्यांनी अखेर प्राण सोडलेला आहे.


शेअर करा