राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढला

शेअर करा

एकीकडे देशाची लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस अन तृणमूल काँग्रेस यांना जोरदार झटका बसलेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहणार आहे तसेच पश्चिम बंगाल येथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे दुसरीकडे आम आदमी पार्टी या पक्षाला राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने दिलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 20 जून 1999 रोजी करण्यात आलेली होती त्यानंतर पुढच्याच वर्षभरात राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि पक्षाने गेले काही वर्ष कसून मेहनत केली मात्र 2014 नंतर राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्रातच जास्त लक्ष दिले त्यानंतर हळूहळू देशभरात राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. नागालँडचा परफॉर्मन्स पक्षाचा चांगला होता मात्र तरीदेखील राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यामुळे टिकत नाही असे नमूद करत राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता काढून घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय पक्ष पक्ष म्हणून दर्जा टिकून ठेवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळवणे गरजेचे असते. लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार वेगवेगळ्या राज्यातून विजयी झाल्याचे झाल्याच्या निकषाचे पालन झाले झालेले पाहिजे. चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणे देखील आवश्यक असून निकषात न बसल्याने राष्ट्रवादीचा दर्जा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता काढून घेण्यात आलेला आहे.


शेअर करा