लग्नात कुठं काय दिलंय ? , गुरुवारी नवरा बायकोत वाद झाला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात समोर आलेले असून लग्नात काहीच दिले नाही म्हणून धारदार शस्त्राने पत्नीवर वार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. माजलगाव शहरापासून अगदी जवळ असलेल्या भाटवडगाव येथील ही घटना असून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रतिभा सुगडे असे मयत महिलेचे नाव असून अनंत भागवत सुगडे असे आरोपीचे नाव आहे. अनंत आणि प्रतिभा यांचा विवाह 2014 साली झालेला होता त्यांना दोन मुले देखील आहेत मात्र अनंत हा सातत्याने त्यांना तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिलेले नाही असे म्हणत त्यांना त्रास देत होता. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य होत असल्याने अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होते.

गुरुवारी त्यांच्यात वाद झाला त्यावेळी अनंत याने प्रतिभा यांच्या शरीरावर धारदार शास्त्राने वार केले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. प्रतिभा यांचे भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित ( राहणार जामखेड जिल्हा नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनंत भागवत सुगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा