सातवीतल्या मुलीला दुसरा महिना , दोघांपैकी एक ताब्यात तर दुसऱ्याने..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार भिगवन पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेला असून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. आरोपींच्या या कृत्यामुळे अल्पवयीन असलेल्या 14 वर्षीय मुलीला दिवस गेलेले असून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर दुसऱ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार ( वय 45 वर्ष ) आणि रमेश रघुनाथ मोरे ( वय 35 ) अशी आरोपींची नावे असून पीडित मुलगी ही अवघ्या 14 वर्षांची आहे. आरोपीने तिला मला तू खूप आवडतेस मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत याला तू नकार दिला तर तुझ्या आई-वडिलांना मी तुझे इतरत्र प्रेमसंबंध आहे असे सांगेल असे आरोपींनी तिला धमकावले होते. गुन्हा दाखल झाल्यावर अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार याने आत्महत्या केलेली आहे .

आरोपींच्या धमकीला घाबरून पीडित मुलगी ही गप्प राहिली त्याचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी तिच्यावर अनेकदा अत्याचार केला त्यातून ती गर्भवती राहिलेली असून तिला दुसरा महिना सुरू आहे. मुलीच्या वडिलांना प्रकरण लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यांनी भिगवन पोलीस ठाण्यात धाव घेतलेली असून दोन्ही आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून दुसऱ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे .


शेअर करा