फोन उचलत नव्हती म्हणून पुण्यातील नातेवाईक तिच्या फ्लॅटवर गेले तर ..

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून बावधन येथे कॉलेज कुमारी असलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बावधन बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रोशनी शंकर भोजने ( वय 23 मूळ राहणार नाशिक ) असे मयत तरुणीचे नाव असून ती शिक्षणासाठी नाशिकवरून पुणे येथे आलेली होती. बावधन परिसरातील एका कॉलेजमध्ये पहिल्या वर्गात ती शिकत होती. काही कारणाने तिने स्वतःची भाड्याची जुनी खोली सोडून सुशांत कॉम्प्लेक्स इथे तिच्या मैत्रिणीसोबत राहायला सुरू केलेले होते. मैत्रीण गावाला गेलेली असल्याकारणाने फ्लॅटमध्ये ती एकटीच होती.

घरच्यांचे फोन देखील ती उचलत नव्हती म्हणून तिच्या घरच्यांनी पुण्यातील काही नातेवाईकांना फोन करून तिथे जाऊन पाहण्यास सांगितले होते. नातेवाईक रूमवर पोहोचले त्यावेळी तिने गळफास घेतलेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून तिने हा प्रकार का केला याचे कारण समोर आलेले नाही.


शेअर करा