पाकिस्तानमध्ये चक्क कबरीला लावलं जातंय लॉक ,काय आहे कारण ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानमधील कबरीची जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबरीत ठेवलेले मृतदेह बाहेर काढून त्यावर बलात्कार करण्याच्या प्रकरणात वाढ होत असल्याने चक्क स्वतःच्या मयत मुलीच्या कबरीला कुलूप लावून असे प्रकार रोखण्यासाठी नागरिक सक्रिय झालेले दिसून येत आहेत. पाकिस्तान येथील कबरीचे फोटो सोशल मीडियात वायरल होत आहेत.

डेली टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलेले असून पाकिस्तानमध्ये मयत झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याच्या घटनांत वाढ होत आहे. आपल्या मुलीचा, आईचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर होत असलेल्या दुःखाची कल्पनाही करवत नाही मात्र तरीदेखील अशा नराधमांना आळा घालण्यासाठी चक्क कबरीवर कुलूप लावण्याचा दुर्दैवी प्रकार आता समोर आलेला आहे.


शेअर करा