नगरकर निघाले भाजून , दुपारची वाहतूक देखील मंदावली..

शेअर करा

नगर शहरात गेल्या काही गेल्या पाच सहा दिवसांपासून उन्हाचा पारा अत्यंत वाढलेला असून नगर शहराचे तापमान तब्बल 42 वर जाऊन पोहोचलेले आहे . शनिवारी 43 डिग्री सेल्सिअस अशा विक्रमी तापमानाची नोंद झाली तर रविवारी देखील 41 डिग्री सेल्सिअस हे शहरातील तापमान होते. उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून दुपारी उन्हात न फिरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.

2023 मध्ये आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत नव्हता. आठ मेपर्यंत देखील पावसाचे वातावरण नगर शहरात होते तसेच अधूनमधून पाऊस येत असल्याने उन्हाळा फारसा जाणवला नाही त्यामुळे नागरिक काही प्रमाणात खुशीत होते मात्र अचानक नऊ मे पासून उन्हाची तीव्रता वाढली आणि रोजच विक्रमी 40 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे तापमान जात असल्याने नगरकर चांगलेच भाजून निघत आहेत.

भरपूर घाम येणे , त्वचा कोरडी किंवा गरम होणे , मळमळ आणि उलट्या होणे , हृदयाची गती वाढणे , जास्त तहान लागणे ,डोकेदुखी ,शुद्ध हरपणे , श्वसन दर वाढणे अशी उष्माघाताची लक्षणे असून शक्यतो बाहेर न पडण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलेले आहे.


शेअर करा