शिर्डीतील लॉजवर वेश्याव्यवसाय प्रकरणी आणखी दोन जण ताब्यात

शेअर करा

नगर जिल्ह्यात गाजलेल्या शिर्डी शहरातील तब्बल सहा लॉजवर छापे टाकून केलेल्या कारवाईत सुमारे 14 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली होती . बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची चौकशी करण्यात आल्यानंतर एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. 22 मे पर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

पाच मे रोजी शिर्डी शहरात पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल सहा ठिकाणी लॉजवर छापे टाकण्यात आलेले होते त्यात सुमारे 14 जणांना अटक करण्यात आलेली होती त्यामध्ये चक्क एक बांगलादेशची अल्पवयीन मुलगी देखील आढळून आणली होती त्यानंतर राहुरी इथून एका महिलेला ताब्यात देखील घेण्यात आले होते .

सदर प्रकरणातील काही आरोपींचा जामीन झालेला असून अमोल आदिनाथ दारकुंडे ( वय 32 वर्ष राहणार शिवाजीनगर जळगाव ) आणि राजेंद्र उर्फ राजा अर्जुन गुरधडे ( वय तीस राहणार म्हाडा कॉलनी आडगाव नाशिक ) यांना अटक करण्यात आलेली आहे. शिर्डी येथील लॉजवर झालेल्या कारवाईत अल्पवयीन मुलगी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. बांगलादेश येथील ही अल्पवयीन मुलगी असून या प्रकरणाचे पाळेमुळे कुठपर्यंत आहेत याचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा