‘ लव्ह जिहाद ‘ सांगत पोलिसांना लावलं कामाला , तरुणीने रचली अशी स्टोरी की..

शेअर करा

पुण्यात एक अजब प्रकार समोर आलेला होता. प्रेमसंबंधातून एका सैफ नावाच्या मुस्लिम तरुणाने आपल्या मैत्रिणीला पळून नेलेले आहे त्यानंतर या मैत्रिणीने आपल्याला गुगलचे आपले लोकेशन पाठवून आपण अडचणीत असल्याबद्दल सांगितलेले आहे अशी तक्रार एका तरुणीने पोलिसात दिलेली होती. सदर प्रकार लव्ह जिहाद असावा अशी देखील शंका तिने व्यक्त केल्याने पोलिसांनी तात्काळ विमानाने दिल्ली इथे पोहोचून या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला असून तक्रारदार तरुणीने फक्त पोलिसांना अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सैफ नावाच्या एका मुस्लिम तरुणाने आपल्या बावीस वर्षांच्या मैत्रिणीला दिल्लीला नेलेले आहे आणि तिथे तिला डांबून ठेवलेले आहे असे सांगत तिने आपण अडचणीत आहोत असे सांगत आपल्याला तिने तिचे लोकेशन पाठवले आहे असा दावा करून ही तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचलेली होती. सदर प्रकार लव्ह जिहाद असल्याचा देखील अंदाज तिने व्यक्त केला म्हणून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता मात्र तपासात हा सर्व भलताच प्रकार असल्याचे समोर आले आहे .

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माध्यमांना माहिती देताना , पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांचे पथक दिल्लीला पोहोचलेले होते. तिथे गेल्यानंतर असा काही प्रकार असल्याचे समोर आलेले नाही असे सांगत पुण्यात ज्या तरुणीने तक्रार नोंदवली होती तिचे नाव प्रणाली असे असून तिचे नुकतेच ब्रेकअप झालेले होते मात्र तिचा आधीचा बॉयफ्रेंड तिला सातत्याने त्रास देत होता.

प्रणाली हिने त्यानंतर पोलिसांच्या 112 नंबर वर फोन करून मदत मागितली मात्र पोलिसांकडून तिला मिळालेल्या प्रतिसादाने ती समाधानी नव्हती म्हणून ती पोलिसांवर खार खाऊन होती. पोलिसांना कामाला लावण्यासाठी तिने ही बनावट स्टोरी रचली आणि पोलिसांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून तिने दिल्लीतील मैत्रिणीला काहीही माहिती न देता केवळ तिचे लोकेशन मागवले आणि पोलिसांची दिशाभूल केली असे समोर आले आहे.


शेअर करा