‘ तपासात मदत करतो पण आमचं बघा ‘ , पोलीस कर्मचारी रंगेहाथ धरला

शेअर करा

नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केलेली असून सुनिता धनगर प्रकरणात विभागाच्या हाती मोठे यश लागलेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , करण गंभीर थोरात ( वय 40 वर्ष ) असे या प्रकरणातील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तक्रारदार यांच्या बहिणीच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी म्हणून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना करण्यास त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.

तक्रारदार व्यक्ती यांच्या बहिणीच्या विरोधात दारूबंदी कायदा अंतर्गत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी करण याने चार हजार रुपये लाच मागितली होती मात्र तक्रारदार व्यक्ती यांनी 1064 नंबर वर फोन करून यासंदर्भात माहिती दिली आणि पंचासमक्ष लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक साधना बेलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रशेखर मोरे , पोलीस नाईक दीपक पवार यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे .


शेअर करा