केडगाव चौफुल्यावर झोपडीत ‘ ते ‘ असल्याची माहिती समजली अन ..

शेअर करा

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील दूरगाव इथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन सराईत गुंडांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील केडगाव चौफुला येथून ताब्यात घेतलेले असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राजू समशुद्दीन शेख ( वय ३० ) आणि अजिज समशुद्दीन शेख ( वय 28 दोघेही राहणार थोटेवाडी दूरगाव तालुका कर्जत ) अशी आरोपींची नावे आहेत. सात एप्रिल 2023 रोजी अल्पवयीन मुलगी स्वयंपाक करत असताना आरोपी पाणी पिण्याच्या बहण्याने तिच्या घरात आलेले होते आणि त्यांनी तिच्या तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार कोणाला सांगितला तर आईला आणि भावाला जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली होती. कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून देखील आरोपींचा तपास सुरू होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर आरोपी हे दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला इथे एका ठिकाणी राहत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आणि त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव ,पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन वखरे, सुनील चव्हाण ,अतुल लोटके यांच्यासोबत शेतमजूर असल्याचे भासवत सुरुवातीला झोपडीची पाहणी केली आणि त्यानंतर कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केलेले आहे.


शेअर करा