बसचालकाचे कंडक्टरच्या मुलीसोबत पलायन, पोलिसांनी आणल्यावर म्हणाले की..

शेअर करा

देशात सध्या एका प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बिहारच्या मुजफ्फरपुर येथील हे प्रकरण आहे. एक सरकारी बस ड्रायव्हर हा त्याच बस कंडक्टरच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि दोघेही घरातून फरार झालेले आहेत. चित्रपटाच्या स्टोरीसारखी त्यांची प्रेमस्टोरी असून या घटनेची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर बस ड्रायव्हर हा ज्या मार्गाने बस चालवत होता त्याच मार्गाने बस कंडक्टरचे घर होते. जिथे तो कधीकधी जेवण करण्यासाठी थांबत असायचा याच दरम्यान त्याची बस कंडक्टरच्या मुली सोबत ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यातील हे प्रेम प्रकरण सुरू होते त्यानंतर ते घरातून पळून गेले.

मुलगी घरातून पळून गेल्यानंतर कंडक्टर असलेल्या वडिलांनी पोलिसात धाव घेत या ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोबाईल लोकेशनच्या आधारे सदर तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतलेले असून पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्यांनी आम्ही प्रौढ असल्याचा दावा केला त्यानंतर दोघांचेही परिवार लग्नाला तयार झाले आणि अखेर तात्काळ बाजारातून लग्नाचे साहित्य आणून पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे.

सदर तरुणाने यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना , आपण सरकारी बस चालवतो आणि तीन चार महिन्यांपासून या बस कंडक्टरच्या मुलीच्या प्रेमात पडलेलो होतो. आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलेले असून आम्ही अत्यंत खुश आहोत असे म्हटलेले आहे तर मुलाच्या घरच्यांनी देखील यावेळी आनंद व्यक्त केलेला आहे तर मुलीच्या वडिलांनी देखील झाले गेले विसरून त्याला जावई म्हणून स्वीकारल्यास मान्यता दिलेली आहे .


शेअर करा