मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या नावाने मेसेज , आयुक्तांकडून आवाहन की.

शेअर करा

नगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या नावाने एक फेक व्हाट्सअप अकाउंट तयार करून त्याला पंकज जावळे यांचा फोटो जोडून त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पैशाची मागणी केल्याचे प्रकरण सध्या समोर आलेले आहे. सदर अकाउंट हे बनवत असून कुठलीही आर्थिक देवाणघेवाण न करण्याचे आवाहन डॉक्टर पंकज जावळे यांनी केलेले आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी आणि ओळखीच्या लोकांना व्हाट्सअपवर डॉक्टर पंकज जावळे यांच्या नावाने मेसेज आलेले होते . त्यामध्ये अकाउंटच्या प्रोफाईलमध्ये पंकज जावळे यांचा फोटो लावलेला होता मात्र मोबाईल नंबर हा आयुक्त पंकज जावळे यांचा नव्हता ही बाब महापालिकेचे प्रसिद्धीप्रमुख शशिकांत नजान यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आयुक्तांना देखील या प्रकरणी माहिती दिली.

महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी याप्रकरणी माझे नाव आणि फोटोचा वापर करून कोणीतरी बनावट अकाउंट तयार केलेले आहे या संदर्भात आपण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहोत असे सांगितलेले असून नागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार या अकाउंटवर करू नये असे सांगण्यात आलेले आहे. याआधी देखील नाशिक इथे असाच प्रकार घडलेला आहे. सदर मेसेज हे बहुतांश प्रमाणात हिंदीतून येतात त्यामध्ये सुरुवातीला जुजबी हाय हॅलो पासून सुरुवात होते आणि त्यानंतर पैशाची मागणी करण्यात येते असे आतापर्यंतच्या अनेक प्रकारात समोर आलेले आहे.


शेअर करा