तिच्याच घरासमोर केला आयुष्याचा शेवट , पोलिसांनी समजूत काढली पण..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण गोव्यात फोंडा इथे समोर आलेले असून मागील 14 वर्षांपासून जिच्यावर प्रेम केले तिने अचानकपणे लग्नाला नकार दिल्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणाने तिच्या घरासमोर गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. तरुणांच्या आई आणि भावाला पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी त्यांची समजूतही काढली होती मात्र अखेर त्याने तिच्याच घरासमोर गळफास घेतलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गावकर आडनावाच्या एका तरुणाचे एकाच उसगाव येथील एका तरुणीवर प्रेम होते. गेल्या 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अनेकदा तिने त्याला आर्थिक मदतही केली मात्र त्यानंतर अचानकपणे ती त्याला टाळायला लागली म्हणून हा प्रियकर नैराश्यात गेलेला होता. मयत तरुणाने तिला आत्महत्या करण्याआधी तीन वेळा आपण विष प्राशन करून आत्महत्या करणार आहोत असे म्हटलेले होते त्यानंतर त्याने हा प्रकार केलेला आहे.


शेअर करा