दोन वर्षांपासून बेपत्ता मुलगी सापडली पण बाळासोबत , नगर जिल्ह्यातील घटना

शेअर करा

तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अखेर नगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना यश आलेले असून याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अश्फाक हमीद मनियार ( राहणार मन्यार वस्ती तळेगाव दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर ) असे आरोपी तरुणाचे नाव असून 26 सप्टेंबर 2021 रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीचे तळेगाव दिघे इथून अपहरण केलेले होते. गुन्ह्याचा तपास लागला नाही म्हणून अखेर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

सदर प्रकरणी तपास सुरू असताना आरोपी हा समर्थनगर सिन्नर जिल्हा नाशिक येथे राहत असल्याची माहिती समजल्यानंतर महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर प्रियंका आठरे यांच्या पथकाने तात्काळ तिथे धाव घेतली आणि 23 वर्षीय आरोपी असलेला अशपाक याला ताब्यात घेतले त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी आणि तिचे आठ महिन्यांचे बाळ या सर्वांना ताब्यात घेऊन संगमनेर येथे आणण्यात आले आहे.

सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या पथकाने केलेली 10 सप्टेंबर 2023 रोजी सिन्नर इथे दाखल होऊन केलेली आहे.


शेअर करा