महावितरण अधिकाऱ्याच्या डोक्यात घातली खुर्ची , लोकअदालत सुरु होती अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब अशी घटना धाराशिव इथे समोर आलेले असून वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी एका सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात खुर्ची घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , हिंगमिरे असे या जखमी झालेल्या अभियंत्याचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . धाराशिवच्या वाशी इथे वीज ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी महावितरणकडून अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी वाद झाल्यानंतर तीन जणांनी सहाय्यक अभियंता यास शिवेगाळ केली आणि त्यांच्या डोक्यात खुर्ची घातली.

वाशी तालुक्यातील सारोळा वाशी इथे लिंक लाईनच्या कामाची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र हे काम अद्यापही सुरू झालेले नाही त्यासाठी सातत्याने चालढकल करण्यात आलेली आहे असा आरोप करत तीन जणांनी अचानकपणे हल्लाबोल केला आणि महावितरण अभियंत्याला मारहाण केली . पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे.


शेअर करा