कर्जतमध्ये कॅफेत ‘ नको तो ‘ प्रकार , दोन जणांवर गुन्हे दाखल

शेअर करा

नगर शहरासह तालुका पातळीवर देखील आता कॉलेज परिसरात कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. पूर्वीच्या काळी सायबर कॅफेमध्ये हा प्रकार व्हायचा मात्र आता सायबर कॅफे यांना काही प्रमाणात निर्बंध आल्यानंतर ही अनोखी शक्कल व्यावसायिकांनी काढून शोधून काढलेली आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कर्जत शहरातील दोन कॅफेंवर छापा टाकून मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या दोन कॅफेंमध्ये हा छापा 18 तारखेला टाकण्यात आलेला असून खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती असल्याची माहिती पथकाला मिळालेली होती. दोन ठिकाणी मोठमोठे कंपार्टमेंट करून त्यामध्ये मुलामुलींना जागा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.

सदर प्रकरणी अजय काकासाहेब निंबाळकर ( राहणार दुर्गाव तालुका कर्जत ) आणि राहुल बाळू पवार ( राहणार अक्काबाई नगर कर्जत ) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात अशाच पद्धतीने अवैध धंदे सुरू असतील तर त्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपल्या भ्रमणध्वनीवर 9552530527 संपर्क साधण्याचे किंवा कर्जत पोलीस ठाण्याच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केलेले आहे. तक्रारदार व्यक्ती यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.


शेअर करा