पायाळू मुलगा आणला अन मध्यरात्रीच्या सुमारास.., महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला असून गुप्तधन शोधण्यासाठी चक्क लहान मुलाचा बळी देण्याचा प्रकार देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. वेळीच ग्रामस्थ सावध झाल्यानंतर हा अनर्थ टळलेला असून एका महिलेसह सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अमरावती जिल्ह्यातील टाकळी जहागीर येथील हा प्रकार असून गुप्तधन शोधण्यासाठी एका पायाळू मुलाला फसवून आणण्यात आलेले होते. 11 ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास एका महिलेच्या घरात अघोरी पूजा सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी पद्धतशीरपणे घरावर पाळत ठेवत कारवाई केली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे.

घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांना तिथे एक चटई , पूजेचे सामान , हळद-कुंकू , टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आणि एक अल्पवयीन मुलगा आढळून आलेला आहे. पोलिसांनी सर्व सामान जप्त केलेले असून मुलाला त्याच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आलेले आहे. संबंधित मुलगा हा मल्हार गावचा रहिवासी असून सहा जणांमध्ये अटक केलेल्या सहामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.


शेअर करा