नगरमध्ये चक्क शवपेटीत बसूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

शेअर करा

नगर शहरातील एका शैक्षणिक संस्थेच्या कंपाऊंडच्या आत दररोज वाहने लावत असल्या कारणाने झालेल्या वादातून शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुंनी एनसी दाखल करण्यात आली होती . ज्यांनी वाहने पार्क केलेली होती त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी तसेच त्याच्या कामगारांनी आपल्याला मारहाण केलेली आहे .

कोतवाली पोलिसांनी त्यांच्या विरोधात केवळ एनसी दाखल केलेली असून आपल्याला मारहाण होऊन देखील पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही म्हणून विजयकुमार चंद्रकांत गायकवाड वय ५५ यांनी नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 ऑक्टोबरपासून एका शवपेटी मध्ये झोपून उपोषण सुरू केलेले आहे. जोपर्यंत समोरील व्यक्तींवर एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे .

प्रवीण ट्रेडर्सचे मालक विशाल कांतीलाल गांधी , वैभव कांतीलाल गांधी , विराज वैभव गांधी आणि इतर आठ कामगार यांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलेला असून जोपर्यंत आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत कॉफीन बॉक्समध्ये बसून आपण उपोषण करणार आहोत असे म्हटलेले आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार ते मराठी मिशनचे अध्यक्ष आणि विश्वस्त वायल्डर चर्च मिनिस्ट्री चे मुख्यत्यार म्हणून काम पाहतात.


शेअर करा