फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात भरदिवसा लुटली ट्रॅव्हल बस , अचानक घुसले अन..

शेअर करा

महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भर दिवसा दरोड्याचा एक प्रकार समोर आलेला असून नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वर दिवसाढवळ्या सात जणांनी मिळून 80 प्रवाशांची बस लुटलेली आहे. आरोपींनी त्यांच्याकडून एक लाख 96 हजार रुपयांचा ऐवजी लुटून त्यानंतर तिथून पलायन केले. सदर प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , अमन ईश्वर इंगळे ( वय 26 वर्ष राहणार रामबाग नागपूर ) , गुलाब शाबीर शेख ( वय 32 वर्ष राहणार कपिल नगर नागपूर ) , रसिद शेख रफिक शेख ( वय 34 वर्ष राहणार दिघोरी नागपूर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रामटेक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या आमडी गावाजवळ एस आबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाच्या बसमध्ये दोन अनोळखी व्यक्ती चढले आणि पेट्रोल पंपावरून आणखीन दोन अनोळखी व्यक्ती बसमध्ये चढले. बसमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रवाशांकडे तिकिटाची मागणी सुरू केली त्यावेळी सर्व प्रवाशांनी आम्ही तिकीट घेतलेले आहे असे सांगितले मात्र आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली.

अवघ्या काही मिनिटाच्या आत आरोपींनी चाकू काढला आणि त्यानंतर पैशासाठी प्रवाशांना त्रास देऊ लागले. आरोपींनी त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख 96 हजार रुपयांची रोकड घेतली आणि त्यानंतर बसमधून उतरून ते पळून गेले. फिर्यादी व्यक्तींनी पोलिसात दाखल होत तक्रार दाखल केलेली असून रामटेक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलेले आहे. बस चालक आणि वाहक यांची देखील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.


शेअर करा