गूढ उलगडलं..बायकोनेच रचला होता सगळा बनाव

शेअर करा

महाराष्ट्रातील एका खळबळजनक अशा हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलेले असून गडचिरोली जिल्ह्यातील ही घटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात दवंडी येथील एका किराणा दुकानदाराची चार दिवसांपूर्वी हत्या झालेली होती . सुरुवातीला पत्नीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर या हत्येमध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर हेच मुख्य आरोपी असल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सरिता असे आरोपी पत्नीचे नाव असून पोलिसांनी तिच्यासोबत तीन जणांना अटक केलेली आहे. दवंडी येथे किराणा दुकान चालवणारे लखन सोनार नावाच्या व्यक्तीची 18 ऑक्टोबर रोजी घरात घुसून मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांनी हत्या केलेली होती. आरोपी पत्नीने त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा बनाव निर्माण केला मात्र तपासात तिचे बिंग फुटलेले आहे.

आरोपी पत्नीने पोलिसांना माहिती देताना पाच जण घरात घुसले आणि त्यांनी आपल्या पतीची हत्या केली अशी फिर्याद पोलिसात दिलेली होती. त्यानंतर आरोपी पत्नीच्या बोलण्यात विसंगती आढळून आली त्यावेळी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा तिने आपण आपल्या पतीचा खून सुभाष नावाच्या प्रियकराच्या मदतीने केलेला आहे अशी कबुली दिलेली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सरिता आणि सुभाष यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते या प्रकरणाची पतीला माहिती झाली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबात वाद होऊ लागले . सतत आपला पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत आहे याची जाणीव झाल्यानंतर पतीची हत्या करण्यासाठी तिने पद्धतशीरपणे प्लॅन रचला आणि काळा कपडा तोंडाला बांधून पाच जण घरात दाखल झाले आणि लखन यांचा खून करण्यात आला . सदर प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा