इंजिनिअरिंग फार्मसी ऍडमिशनबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे महत्वाचे अपडेट

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी सीईटीच्या मार्काला मोठ्या प्रमाणात महत्त्व असून बारावीच्या परीक्षेतील मार्क आणि राज्य सरकारच्या सीईटीचे परीक्षेचे गुण एकत्रित करून तयार झाल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार इंजिनिअरिंग फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासात अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे.

दीपक केसरकर यांनी बोलताना , ‘ ज्युनिअर कॉलेज आणि कोचिंग क्लासेस यांच्यात टाय अप असल्याकारणाने अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू असताना अकरावी आणि बारावीमध्ये असताना कॉलेजला अनुपस्थित राहतात आणि सीईटीचा अभ्यास करतात कारण केवळ सीईटीच्या गुणावरच इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते मात्र त्यामुळे इयत्ता अकरावी बारावीच्या इतर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. वर्गांमध्ये आपण फेस रिकगनायझेशन यासाठी आता यंत्रणा लावणार आहोत असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

दीपक केसरकर यांनी ज्युनिअर कॉलेजमध्ये थम्ब इम्प्रेशनवर हजेरी वाढली पाहिजे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात घेण्याचे संकेत दिलेले असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे घेऊन त्यांचा निकाल तातडीने जाहीर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे देखील सहाय्य घेतले जाईल असे देखील म्हटले आहे . दीपक केसरकर यांनी खाजगी क्लासेसला देखील आवाहन करत स्वतःचे ज्युनिअर कॉलेज काढून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करावे . त्यांनी कॉलेज सुरू करण्याची मागणी केली तर त्यांना परवानगी देखील देण्यात येईल , असे देखील म्हटलेले आहे.


शेअर करा