संगमनेरच्या ‘ सेलिब्रेशन ‘ प्रकरणात चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन इथे नऊ तारखेला घडलेल्या हाणामारी प्रकरणात आपल्यासोबत उद्धट वर्तन करत अश्लील हावभाव आणि शेरेबाजी केल्याचा आरोप करत एका तरुणीने माजी नगरसेवक असलेले नितीन अभंग यांच्यासोबत चार जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नऊ तारखेला रात्री अकराच्या सुमारास शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन इथे ही तरुणी आलेली होती. तिथे आल्यानंतर तिने जेवण देण्याची मागणी केली मात्र उशीर झालेला असल्याकारणाने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला नकार दिला याचा तिला राग आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी केली असा देखील आरोप या तरुणीने करत हॉटेल मालकासह चार जणांनी आपल्याला मारहाण देखील केलेली आहे असे देखील तिने म्हटले होते.

संगमनेर शहर पोलिसांनी त्यानंतर फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून योगेश सूर्यवंशी , सम्राट हासे , विकास डमाळे , दीपक रणसुरे या चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. फिर्यादी तरुणीच्या म्हणण्यानुसार यावेळी घडलेल्या गदारोळात आपली दीड तोळे वजनाची सोनसाखळी देखील आरोपींनी लंपास केलेली आहे असेही तिचे म्हणणे आहे.

संतप्त झालेल्या तरुणीने त्यानंतर माजी नगरसेवक आणि हॉटेल मालकावर पोलिसांनी किरकोळ कारवाई केली असा देखील आरोप केला त्यानंतर सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर पीडित तरुणीच्या पुरवणीजबाबावरून पप्पू अभंग , माजी नगरसेवक नितीन अभंग , त्यांचे बंधू प्रवीण आणि अंकुश अभंग यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


शेअर करा