राहुरीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न , दमदाटी करत गाडीत बसवलं अन.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार समोर आलेला असून ‘ गाडीत बस आणि माझ्याबरोबर चल नाहीतर तुझ्या दाजीला मारून टाकील ‘ अशी धमकी देत राहुरी शहरातून एका कॉलेज तरुणीला पळवून नेल्याचा प्रकार 17 तारखेला समोर आलेला आहे . एका तरुणावर विनयभंगासोबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे वय सोळा वर्ष दोन महिने असून ती राहुरी शहरात शिक्षणानिमित्त तिची बहीण आणि दाजी यांच्याकडे राहत असून इयत्ता अकरावीमध्ये शिकते. कॉलेजला शिकत असताना एक आरोपी तिचा नेहमी पाठलाग करायचा त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ती कॉलेजमध्ये येत असताना आरोपीने तिचा mh17 एजे ५७०७ या ईरटीका गाडीतून पाठलाग केला आणि त्यानंतर कॉलेजच्या समोर गाडी घेऊन तो थांबला.

कॉलेजच्या समोर गाडी उभी केल्यानंतर अल्पवयीन मुलगी तेथून जात असताना आरोपीने तिला ‘ तू गुपचूप माझ्या गाडीत बस नाहीतर तुझ्या दाजीला ठार मारेल ‘ असे म्हणत तिला आपल्या गाडीत बसवले . राजन चंद्रकांत सुसे असे या आरोपीचे नाव असून त्यानंतर त्याने गाडी वेगाने पळवली. आपल्याला पळून जायचे आहे असे तो तिला म्हणत होता मात्र याच दरम्यान त्याला कुणाचा तरी फोन आला.

आरोपीने त्यानंतर गाडी मागे फिरवली आणि तिला राहुरी बस स्टँड जवळील एका रिक्षा स्टैंडवर सोडून दिले. आपले अपहरण करण्यात आल्याचे या तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ या प्रकरणी कुटुंबीयांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्यानंतर आरोपी राजन चंद्रकांत सुसे यांच्या विरोधात विनयभंग आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा