ट्रिपल मर्डर करणारे अद्यापही सापडेनात , वहिनी भाऊ अन मुलाला तर चक्क..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे खुनाचे प्रकरण सध्या समोर आलेले असून पंजाब येथील ही घटना आहे. पंजाबमध्ये ट्रिपल मर्डर करण्यात आलेला असून एका वेळेस व्यसनी व्यक्तीने त्याच्या मोठ्या भावाची , वहिनीची आणि अवघ्या दोन वर्षांच्या पुतण्याची देखील हत्या केलेली आहे. मोहाली जिल्ह्यातील खरारमधून ही घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , लखविंदर सिंग असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने त्याच्या मित्रांना सोबत घेत तीन जणांची हत्या करण्याचा कट रचलेला होता. त्याचा मोठा भाऊ असलेला सतबीर सिंग ( वय 32 ) त्याची पत्नी अमनदीप कौर आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अनहद यांची आरोपीने हत्या केलेली आहे.

आरोपी व्यक्तीने सर्वात आधी त्याच्या वहिनीची हत्या केली . तिचा गळा आवळून खून केल्यानंतर भाऊ कार्यालयातून घरात आला त्याचवेळी त्याच्यावर हल्ला केला आणि कुऱ्हाडीने वार करून त्याचा देखील खून केला. दोघांचेही मृतदेह गाडीत टाकून त्याने एका कालव्यात फेकून दिले. आरोपी त्यानंतर दोन वर्षाच्या पुतण्याला देखील गाडीतून घेऊन गेला आणि त्याला जिवंत असतानाच कालव्यात फेकून दिले. लखविंदरचा मित्र असलेला गुरुदीप सिंग याने त्याला मदत केल्याची माहिती असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.

पोलिसात तक्रार देण्यासाठी देखील आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात आलेला होता. 10 ऑक्टोबर रोजी त्याने त्याचा सहकारी असलेला गुरुदीप सिंग यांच्या मदतीने वहिनीला मारहाण केली आणि तिचा खून केला. रात्री भाऊ सतबीर घरी आल्यानंतर त्याचाही खून केला त्यानंतर दोन वर्षांच्या पुतण्याला सोबत घेऊन गेले आणि जिवंत असताना त्याला कालव्यात फेकून दिले त्यामध्ये त्याचा देखील मृत्यू झालेला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात आरोपी हा भावाची प्रगती पाहून जळत होता त्यातून त्याने हा प्रकार केला आहे .


शेअर करा