महावितरणचे पाटणकर साहेब आले एसीबीच्या जाळ्यात , तक्रारदाराने लावलं कामाला

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या कोल्हापूरमध्ये समोर आलेला असून महावितरणच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अनधिकृतपणे वीज वापर झाल्यानंतर दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना पकडलेले आहे. यातील एक व्यक्ती अतिरिक्त कार्यकारी अभियंता असून दुसरा सहाय्यक लेखापाल आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर ( वय 47 राहणार खासबाग मैदान मंगळवार पेठ कोल्हापूर मूळ राहणार पन्हाळा ) आणि सहाय्यक लेखापाल रवींद्र बापूसाहेब बिरनाळे ( वय 38 राहणार आमराई रोड शिक्षक कॉलनी इचलकरंजी ) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

अनधिकृतपणे वीज वापर केल्यानंतर तक्रारदार यांना दंड झालेला होता त्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केलेली होती. तक्रारदार व्यक्ती यांनी स्वतःच्या इमारतीमध्ये औद्योगिक परवाना वीज जोडणी करून घेतलेली होती त्यानंतर व्यावसाय बंद झाल्याने त्याने ती इमारत वीज जोडणीसह कराराने भाड्याने दिलेली होती. पाहणी दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर त्यास दंड करण्यात आला.

एकूण दंड एक लाख 22 हजार रुपये होता त्यावेळी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडे दंडाची रक्कम 19000 आणि लाच म्हणून 41 हजार अशी एकूण 60 हजार रुपयांची मागणी केली होती त्यानंतर प्रकरण मिटून घेऊ असे सांगण्यात आले. तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबर वर संपर्क करून याप्रकरणी माहिती दिली आणि सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.


शेअर करा