‘ माझा नंबर ब्लॉक का केला ? ‘, संगमनेरमध्ये महिलेला रात्री अडीचला मारहाण

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एका महिलेसह तिच्या मित्राला दोन जणांनी कोयत्याने मारहाण केलेली आहे. संगमनेर येथील ही घटना असून मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास शहराजवळील मालपाणी हेल्थ क्लब जवळ हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार महिला ही हेल्थ क्लब च्या जवळ राहणारी असून आपल्या मित्रासोबत घरी असताना तिच्याजवळ राहणारा राजेश जम्बुकर आणि त्याचा एक मित्र हे तक्रारदार महिलेच्या घरी आले आणि त्यांना तू माझा नंबर ब्लॉक का केला असे विचारले. महिलेने काही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने महिलेच्या दोन्ही हातावर बोटांवर आणि डोक्यावर मारून तिला जखमी केले.

आरोपीच्या मित्राने हातातील लाकडी दांडा महिलेचा मित्र असलेला विलास काळे यांच्या गुडघ्यावर मारला त्यामध्ये विलास देखील गंभीर जखमी झालेला असून दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिलेने फिर्याद दिलेल्या असून पोलिसांनी राजेश जंबुकर आणि त्याचा मित्र वैभव ( दोघेही राहणार ढोलेवाडी संगमनेर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा