‘ वंशावळ ‘ वरून मनोज जरांगे पाटलांनी धनुभाऊंना केलं निरुत्तर

शेअर करा

सरकारला 24 डिसेंबरची मुदत देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी रात्री आठच्या सुमारास उपोषण पाठीमागे घेतलेले असून उपोषण सोडताना सरकारच्या शिष्टमंडळात सोबत चर्चा केली त्यावेळी मंत्र्याच्या मुद्द्यांना देखील त्यांनी अत्यंत मुद्देसूदपणे उत्तरे दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी मंत्री उदय सामंत , धनंजय मुंडे अतुल सावे आणि संदिपान भुमरे यांचे शिष्टमंडळ पोहोचलेले होते. धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांची वेळ मागितली आणि त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की , ‘ मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ लागेल कारण कायद्यात आरक्षण टिकावे म्हणून वंशावळीचा अभ्यास करावा लागेल म्हणून हा वेळ देणे गरजेचे आहे .’

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना , ‘ आजपर्यंत कोणत्या जातीला आरक्षण देताना तुम्ही वंशावळ पाहिली ? ‘ असा प्रश्न विचारला त्यावर मात्र धनंजय मुंडे यांच्याकडे कुठलेही उत्तर नव्हते. जरांगे पाटील पुढे म्हणाले की , ‘ 1993 ला मंडळ आयोग लागू करण्यात आला तेव्हा ओबीसीमध्ये इतर उपजातींचा समावेश करण्यात आला तेव्हा वंशावळ किंवा पुराव्याचा आधार घेण्यात आलेला नाही. ‘. मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची वेळ सरकारला दिलेली असून जर या तारखेपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळाले नाही तर मुंबईत मोठे आंदोलन उभे करेल , असा देखील इशारा दिलेला आहे.


शेअर करा