काल तुझं गुडबाय अन आज माझं , अवघ्या विसाव्या वर्षी टोकाचं पाऊल

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना नाशिक जिल्ह्यात समोर आलेली असून ‘ मी जात आहे तू मला रात्री गुड बाय म्हणाली होती आता मी तुला गुड बाय करतो आणि हा शेवटचा गुडबाय आहे ‘ असा मेसेज लिहून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अर्जुन निलेश पवार ( वय 20 वर्ष राहणार नारायणगड तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) असे मयत तरुणाचे नाव असून अर्जुन हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कौटुंबिक वादातून त्याने 31 तारखेला संध्याकाळी पाचच्या दरम्यान पत्नीला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती .

सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने , ‘ मी जात आहे . तू मला रात्री गुड बाय म्हणाली होती आता मी तुला गुड बाय करतो ‘ असे म्हणत त्यानंतर मोबाईल बंद केला आणि तो घरातून निघून गेला. गुरुवारी दोन तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास नांदूर शिंगोटे शिवारात एका झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता . पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलीस अंमलदार महाजन पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा