तब्बल दोन वर्षांनी अल्पवयीन मुलीचा शोध लागला , आरोपी ताब्यात

शेअर करा

नगर जिल्ह्यातून गायब असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अखेर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आलेले असून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केलेली आहे. तब्बल दोन वर्षांनी या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , गणेश भाऊसाहेब चव्हाण ( राहणार पेमगिरी तालुका संगमनेर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गणेश याने 19 मार्च 2019 रोजी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेलेले होते. संगमनेर शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला मात्र तरीदेखील आरोपी हाती लागला नाही म्हणून अखेर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपास वर्ग करण्यात आलेला होता.

तपासाला नव्याने सुरुवात झाली त्यावेळी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पथकाला आरोपीचा ठावठिकाणा समजला आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपअधीक्षक कमलाकर जाधव , पोलीस उपअधीक्षक गृह शाखा हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे .


शेअर करा