गूढ उलगडलं..ज्याचा अंत्यविधी केला तो जिवंत मग अंत्यविधी नक्की कुणाचा ? 

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत विम्याचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी एका जिम ट्रेनरने भलताच कारनामा केलेला आहे. त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत मित्राची हत्या केली मात्र हे प्रकरण अखेर समोर आलेले असून त्याच्यासोबत इतर तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून तामिळनाडू येथील हे प्रकरण आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुरेश आर ( वय 38 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तामिळनाडूमध्ये सात सप्टेंबर 2023 रोजी चेंगल पेठ इथे एका झोपडीला आग लागली होती त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यानंतर सुरुवातीला तपास करून फाईल बंद केली मात्र काही महिन्यातच हे प्रकरण समोर आले आणि झोपडीमध्ये मृत्युमुखी पडलेला जो व्यक्ती होता तो प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले . मुख्य आरोपी व्यक्तीने  या प्रकरणात स्वतःच्या मित्राची हत्या केल्याची घटना घडलेली होती. 

सुरेश आर चेन्नई इथे फिजिकल ट्रेनर म्हणून काम करत होता . चेन्नई वरून तो चेंगल पेठच्या अल्लानूर गावी राहण्यासाठी आला आणि 16 सप्टेंबर रोजी त्याच्या झोपडीला आग लागली आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता . सुरेश याच्या आईने आपल्या मुलाचा यात मृत्यू झालेला आहे अशी माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली मात्र काही काळातच तपास बंद करण्यात आला तर दुसरीकडे सुरेशचा मित्र दिल्लीबाबू ( वय 39 ) हा बेपत्ता असल्याची माहिती बाबू याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी त्यानंतर तपासाला सुरुवात केली आणि तपासाची सुई सुरेशच्या घरापर्यंत येऊन थांबली.  पेंटर असलेला दिल्लीबाबू हा सुरेश कडे काही काळ आलेला होता. त्याच्या पालकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत habeas corpus पिटीशन दाखल केली त्यावर सुनावणी करताना पोलिसांना तपासाचे आदेश न्यायालयाने केले आणि हा सर्व प्रकार समोर आला. 


शेअर करा